
गुवाहाटी : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ईशान्य भारताला पावसाने झोडपून काढले असून आसाममधील पूरस्थिती अद्याप गंभीरच आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांतील साडेपाच लाख नागरिक पुरात अडकले आहेत. पूर व दरडी कोसळल्यामुळे राज्यात आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली.