
नवी दिल्ली: भारतातील वायव्येकडील राज्यांत यंदाच्या मॉन्सूनमध्ये आॅगस्ट महिन्यात सरासरी २६५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद २००१पासूनच्या आॅगस्ट महिन्यातील पावसाच्या नोंदींमधील सर्वाधिक असून, १९०१ पासून करण्यात आलेल्या नोंदींपैकी १३ वी सर्वाधिक पावसाची नोंद असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले.