बंडखोरी करुन स्वतंत्र पक्ष काढणार? गुलाम नबी आझाद म्हणतात...

gulam nabi azad
gulam nabi azad

नवी दिल्ली : काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांच्या गटामधील वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नवा राजकीय पक्ष काढण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलंय, मात्र, त्याच स्वरात ते म्हणाले की, राजकारणात पुढे काय घडणार हे कुणीच सांगू शकत नाही.

gulam nabi azad
देशातील कार्डधारकांच्या संख्येत वाढ; व्यवहारांची उलाढाल वाढली

एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. आझाद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक बैठका तसेच सभा घेतल्या आहेत. त्यामुळे तर्कांना उधाण आले आहे. त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या २० जणांनी अलीकडेच काँग्रेसचा निरोप घेतला आहे. बैठका घेण्याबद्दल ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आल्यानंतर राजकीय उपक्रम ठप्प झाले होते. त्यास संजीवनी देण्याचा उद्देश आहे. पाच ऑगस्ट २०१९ पासून अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले. जे तुरुंगाबाहेर आहेत त्यांना कोणतेही राजकीय कार्य करू दिले जात नाही. त्यामुळे मी वाव मिळताच सुरवात केली. विशेष म्हणजे इतर पक्षही आता काम करू लागले आहेत. आम्ही सुरवात करून त्यांना जागे केले.

gulam nabi azad
देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; केंद्राचा पाच राज्यांना इशारा

नवा पक्ष काढणार का, या प्रश्नावर ते असेही म्हणाले की, राजकारणात पुढे काय होणार हे कुणीच सांगू शकत नाही, जसे आपण केव्हा मरू हे कुणाला माहीत नसते. मला राजकारणातून निवृत्त व्हायचे होते, पण लाखो समर्थकांसाठी मी सक्रिय आहे.

काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर हे आझाद यांच्या बैठकांना अनुपस्थित राहिले आहेत. याविषयी छेडले असता आझाद म्हणाले की, कदाचित माझा वेग आणि क्षमतेशी ते बरोबरी करू शकत नसावेत. ४० वर्षांपूर्वी राजकीय प्रवास सुरू केला तेव्हा होती तितकीच ऊर्जा माझ्याकडे आहे. मी दिवसाला १६ सभा सुद्धा घेऊ शकतो. समर्थकांनी मागणी केली असली तरी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा नसल्याचेही आझाद यांनी स्पष्ट केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com