Pt. Bhimsen Joshi: किराणा घराण्याने शास्त्रीय संगीताला दिले अनेक दिग्गज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pt. Bhimsen Joshi

Pt. Bhimsen Joshi: किराणा घराण्याने शास्त्रीय संगीताला दिले अनेक दिग्गज

पं. भीमसेन जोशी हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातले एक खूप नावाजलेले आणि मोठे नाव आहे. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांनी संगीत क्षेत्रात दिलेले आपले योगदान खूप मोठे आहे. पं. भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे वंशज होते, खुद्द सवाई गंधर्व त्यांचे गुरु होते.

हेही वाचा: Andaman Cellular Jail : सावरकरांच्या कारावासामुळे फेमस झालेलं सेल्युलर जेल नक्की कोणी बांधल? जाणून घ्या इतिहास

संगीत क्षेत्रात किराणा घराणं खूप मोठं आहे; इसवी सन १३ च्या शतकात महाराष्ट्रातील औरंगाबादजवळच्या देवगिरी शहरात यादवांचे राज्य होते. त्यावेळी रामदेवराव यादव यांच्या दरबारात गोपाळ नायक नावाचे एक ध्रुपद गाणारे गायक होते. दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा देवगिरी जिंकले तेव्हा त्याने देवगिरीच्या दरबारातील अनेक संगीततज्ज्ञांना पळवून दिल्लीला नेले. त्यांपैकी असलेले एक गोपाळ नायक, हे किराणा घराण्याचे आद्य संस्थापक.

हेही वाचा: Narendra Modi : अंदमानच्या या २१ आयलंडना मिळाली परमवीर चक्र विजेत्यांची नाव; जाणून घ्या सविस्तर

त्यांचे शिष्य भन्नू नायक आणि धोंडू नायक. घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे गायक ग़ुलाम अली आणि ग़ुलाम मौला हे होते, तर चौथ्या पिढीत आले उस्ताद बंदे अली खान.. किराणा घराण्याचे प्रवर्तक समजले जाणारे उस्ताद अब्दुल करीम खान हे गोपाळ नायक यांनी निर्माण केलेल्या संगीत परंपरेतील पाचव्या पिढीचे गायक.

Kirana Gharane Vanshaj

Kirana Gharane Vanshaj

हेही वाचा: Men's Fashion: ब्लेझर घेताय? पुण्याच्या या ठिकाणी आहे १ हजारापर्यंतचे बेस्ट ऑप्शन!

उस्ताद अब्दुल करीम खान, हे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरजवळच्या शामली जिल्ह्यातील कैराना नावाच्या गावाचे रहिवासी होते. त्यावरून या घराण्याचे नाव कैराना पडले. मात्र, पुढे हे घराणे ’किराणा’ (हिंदीत किराना) या नावाने प्रसिद्धीस आले. तथापि गायकीत हे घराणे लोकप्रिय करण्याचे श्रेय उस्ताद अब्दुल करीमखाँ  यांनाच द्यावे लागेल. अब्दुल करीमखॉंनंतर या घराण्यात अनेकविध गायकी दाखल झाल्या. 

हेही वाचा: Winter Friendly Food : हिवाळ्यात बनवा गूळ भाताची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

किराणा घराण्यात अनेक दिग्गज गायक होवून गेलेत; बघूयात त्यांच्याबद्दल माहिती:- 

 • अब्दुल करीम खान, 1872-1937, संस्थापक

 • अब्दुल वाहिद खान, 1885-1949, करीम खान यांचे पुतणे आणि किराणा घराण्याचे सह-संस्थापक

 • सवाई गंधर्व, 1886-1952, करीम खान यांचे शिष्य

 • सुरेशबाबू माने, 1902-53, करीम खान यांचा मुलगा आणि शिष्य यानेही वाहिद खान यांच्या हाताखाली शिक्षण घेतले.

 • हिराबाई बडोदकर, 1905-89, करीम खान यांची कन्या आणि शिष्याने देखील वाहिद खान यांच्या हाताखाली शिक्षण घेतले.

हेही वाचा: Men's Winter Fashion : मुलांनो! वाढत्या थंडीत फॅशन सेन्स जपायचाय? मफलरच्या या स्टाईल्स करा ट्राय

 • रोशन आरा बेगम

 • सरस्वती राणे

 • गंगुबाई हंगल, 1913-2006, सवाई गंधर्वांच्या शिष्या

 • भीमसेन जोशी, 1922-2011, सवाई गंधर्वांचे शिष्य

 • प्रभा अत्रे, सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदकर यांच्या शिष्या

 • माणिक वर्मा, सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदकर यांचे शिष्य, त्यांचे शिक्षण इतर घराण्यांमध्येही झाले.

टॅग्स :music