Andaman Cellular Jail : सावरकरांच्या कारावासामुळे फेमस झालेलं सेल्युलर जेल नक्की कोणी बांधल? जाणून घ्या इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andaman Cellular Jail

Andaman Cellular Jail : सावरकरांच्या कारावासामुळे फेमस झालेलं सेल्युलर जेल नक्की कोणी बांधल? जाणून घ्या इतिहास

Andaman Cellular Jail : सावरकरांवरून आपल्याकडे सतत काहीना काही वादाची ठिणगी ही पडतच असते. सध्या अंदमानच्या सेल्युलर जेलचा परत एकदा उल्लेख आढळतो आहे; स्वातंत्र्यवीर सावरकरांना तिथे काळया पाण्याची शिक्षा झाली होती.

हेही वाचा: Cellular Jail : सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे नेमकं काय ?

नक्की काय आहे काळया पाण्याची शिक्षा?

अंदमान-निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये हे तुरुंग आहे. भारता पासून हजारो किलोमीटर अंतरावर दुर्गम ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या सैनिकांना तुरूंगात ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी हे जेल बांधले होते.

हेही वाचा: Mosquitos in Jail : कोठडीत होतोय त्रास! दाऊदच्या सहकाऱ्याची बाटलीत मच्छर घेऊन थेट कोर्टात धाव

तुरुंगाचे बांधकाम

आपल्या स्वातंत्र्य सैनिकांवर झालेल्या अत्याचारांचा मूक साक्षीदार म्हणजे हे सेल्युलर जेल, याचा पाया १८९७ मध्ये रचला होता आणि १९०६ मध्ये हे पूर्ण झाले होते.खरंतर, ब्रिटिशांच्या इतर अनेक वास्तूंप्रमाणे हे जेलही त्यांच्या सुंदर आर्किटे्चरचा एक सुंदर नमुना आहे. इथे एकूण ६९४ खोल्या आहेत.

हेही वाचा: Nashik Central Jail : नातेवाइकांच्या भेटीने बंदिवानांना बळ

प्रत्येक कोठडीचा आकार ४.५ बाय २.७ मीटर (१४.८ फूट × ८.९ फूट) होता आणि व्हेंटिलेशन साठी एक खिडकी ३ मीटर (९.८ फूट) उंचीवर आहे पण यातही खिडकीतून उजेड येतो पण बाहेरचा सूर्य कधीच दिसत नाही. प्रात:विधी आटोपण्यासाठी कोठडीत एक भांडं ठेवलेलं.

हेही वाचा: Video : Yerawda Jail मधून सुटका झालेल्या कैद्यांचं 'प्रेरणापथने' कसं बसदललं आयुष्य ?

कोठडीची कडी भिंतीत जवळजवळ फुटभर आत गेलेली आणि दोन कोठड्या या एकमेकांना पाठमोऱ्या. चुकूनही एखाद्या कैद्याचा दुसऱ्या कैद्याशी संवाद होणार नाही, एवढंच काय तर नजरा नजरही होणार नाही याची खबरदारी घेत हे जेल बांधले गेले आहे. म्हणूनच तर सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर दोन वर्षं अंदमानात असूनही सावरकरांना, हे कळलं नव्हतं.

हेही वाचा: Azamgarh Jail : 2500 कैदी असलेल्या आझमगड कारागृहात 10 कैद्यांना HIV ची लागण

ऑक्टोपस प्रमाणेच मध्यभागी एक मनोरा, त्यातून निघणाऱ्या सात शाखा, अशी याची आखणी आहे. प्रत्येक शाखेला तीन मजले आणि प्रत्येक मजल्यावर एकवीस कोठड्या. म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागात जायचं तर मधला मनोरा पार करूनच जावं लागणार.

हेही वाचा: Mosquitos in Jail : कोठडीत होतोय त्रास! दाऊदच्या सहकाऱ्याची बाटलीत मच्छर घेऊन थेट कोर्टात धाव

तुरुंगाची सद्यस्थिती

आता आपण यातल्या फक्त ३ शाखा बघू शकतो; दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अंदमान बेटांवर जपानी सैन्याने ताबा मिळवला होता. या दरम्यान, आपल्या सैन्यासाठी बॅरेक्स बांधण्यासाठी त्यांनी जेलच्या तीन शाखा पाडल्या होत्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुरुंगाच्या आणखी दोन शाखा पाडण्यात आलेल्या.

हेही वाचा: Mosquitos in Jail : कोठडीत होतोय त्रास! दाऊदच्या सहकाऱ्याची बाटलीत मच्छर घेऊन थेट कोर्टात धाव

यामुळे अनेक माजी कैदी आणि राजकीय नेत्यांकडून निषेध झाला ज्यांनी याकडे त्यांच्या छळाचा पुरावा मिटवण्याचा हा एक प्रयत्न आहे असा आरोप केलेला यानंतर मात्र उरलेल्या 3 शाखा आणि मध्यवर्ती टॉवरचे 11 फेब्रुवारी 1979 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री.मोरारजी देसाई यांनी राष्ट्रीय स्मारकात रूपांतर केले. 10 मार्च 2006 रोजी तुरुंगाची शताब्दी पूर्ण झाली.

टॅग्स :SavarkarVeer Savarkar