Chinese Phones Alert : चिनी मोबाईलपासून सावध राहा; गुप्तचर संस्थांकडून अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinese Phones Alert

Chinese Phones Alert : चिनी मोबाईलपासून सावध राहा; गुप्तचर संस्थांकडून अलर्ट

नवी दिल्लीः संरक्षण विभागाच्या गुप्तचर संस्थांनी चायनिज मोबाईलसंबंधाने सावधानतेचा इशारा दिला आहे. सुरक्षा यंत्रणांनी, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी चिनी कंपन्यांचे मोबाईल वापरण्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

भारत सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी चिनी मोबाईल फोन वापरासंबंधी सावध केलं आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवरुन चीनसोबत चाललेल्या चकमकीवरुन गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. भारतीय सैनिकांनी चिनी मोबाईल वापरु नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

संरक्षण विभागाच्या गुप्तचर यंत्रणांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की, लष्करी तुकड्या आणि युनिट्सनी चिनी मोबाईल वापरताना काळजी घ्यावी किंबहूना वापरु नये. शिवाय सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांनीही चिनी मोबाईलपासून दूर राहावं, असं सांगण्यात आलंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी चिनी मोबाईल वापरण्यावरुन एक अॅडव्हाजरी जारी केली आहे. काही मोबाईलमध्ये मॅलवेअर आणि स्पायवेअर आढळल्याची माहिती आहे.

व्हीओ, ओप्पो, श्योओमी, वन प्लस, ऑनर, रियल मी, जेडटीई, जियोनी, आसुस, इन्फिनिक्स हे मोबाईल सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी वापरु नये, असं सांगण्यात आलेलं आहे.

टॅग्स :Chinaindian army