Mannu Bhandari : प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mannu Bhandari
Mannu Bhandari : प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी यांचे निधन

Mannu Bhandari : प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी यांचे निधन

नवी दिल्ली : हिंदीतील प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी (Mannu Bhandari) यांचे आज सोमवारी (ता.१५) निधन झाले. त्यांच्यावर हरियानातील एका दवाखान्यात उपचार सुरु होते, अशी माहिती त्यांची मुलगी रचना यादव यांनी सांगितले. आँखो देखा झूठ, आपका बंटी या लोकप्रिय कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. भन्नू भंडारी यांचा जन्म ३ एप्रिल १९३१ मध्ये झाला होता. त्यांच्या निधनाने हिंदी साहित्यातील (Hindi Literature) एका पिढीचा शेवट झाला आहे. भोपाळ येथे जन्मलेल्या भंडारी या नवकथा आंदोलनाच्या भाग होत्या. या आंदोलनाची सुरुवात निर्मला वर्मा, राजेंद्र यादव, भीष्म साहनी, कमलेश्वर या सारख्या लेखकांनी केली होती. मन्नू भंडारी अशा लेखिका होत्या, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर भारतातील महत्त्वाकांशी महिलांच्या कथा लिहिल्या आहेत.

हेही वाचा: प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी

त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांत महिला पात्रांचे संघर्ष आणि समाजातील त्यांची स्थितीचे चित्रण केले गेले आहे. त्यांची महिला पात्र जुन्या रुढीपरंपरा तोडताना, स्वातंत्र अस्तित्वाची गोष्टी सांगताना दिसते. प्रसिद्ध लेखक राजेंद्र यादव हे त्यांचे पती होते. त्यांच्यासह मन्नू भंडारी यांची पहिली कादंबरी 'एक इंच मुस्कान' १९६१ मध्ये प्रकाशित झाली होती. ही कादंबरी त्यांनी राजेंद्र यादव यांच्यासह लिहिली होती. ती खूप लोकप्रिय होती.

loading image
go to top