प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी | Pradnya Satav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाॅ. प्रज्ञा सातव
प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी

प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि.हिंगोली) : राज्यसभेचे दिवंगत खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी डॉ प्रज्ञा सातव यांना काँग्रेस पक्षाकडून (Congress Party) विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून डॉ प्रज्ञा सातव (Dr.Pradnya Satav) यांना संधी देण्याची मागणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून ही राजीव सातव यांच्या कार्याची दखल घेत सातव कुटुंबियातील सदस्याला विधान परिषदेची (Legislative Council) संधी देत पक्षाच्या विचारधारेत सामावून घेतल्याचे मानले जात आहे. राज्यसभेचे खासदार अॅड राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर सातव कुटुंबियातील त्यांच्या पत्नी डॉ प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर संधी देण्यात येईल, असे मानले जात होते. दिवंगत खासदार राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षाअंतर्गत यशस्वीपणे सांभाळली जबाबदारी व पक्ष नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांचा विश्वास संपादन करून पक्ष संघटन मजबूत करण्याकरता केलेल्या कार्याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतलेली होती.

हेही वाचा: 'शांततेच्या मार्गाने वाटचाल करताना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न'

पक्ष नेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होते. राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेस पक्ष सातव कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी हमी सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी जाहीरपणे दिली होती. मध्यंतरीच्या काळात पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरून डॉ प्रज्ञा सातव यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पक्ष कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्ष पद देऊन पक्षात संघटनेत स्थान दिले होते. त्यानंतर डॉ प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्षाचे काम हाती घेतले होते. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर डॉ प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याची घोषणा सोमवार (ता.१५) जाहीर करण्यात आली आहे. एकंदरीत पक्ष नेते राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे दिवंगत खासदार अॅड राजीव सातव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करून काँग्रेस पक्ष नेतृत्वाने सातव कुटुंबियातील सदस्याला पक्षाच्या विचारधारेत सामावून घेत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पश्चात जिल्हा अंतर्गत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिलासा देत दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

हेही वाचा: JNU मध्ये विद्यार्थी संघटना पुन्हा भिडल्या, अनेक जण जखमी

कार्यकर्त्यांकडून जल्लोष

दिवंगत खासदार अँड राजीव सातव यांच्या पत्नी डॉ प्रज्ञा सातव यांना काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शहरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बस स्थानक परिसरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला

loading image
go to top