आता राष्ट्रीय महामार्गावर टोलनाक्यांऐवजी कॅमेरे बसवले जाणार : नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता राष्ट्रीय महामार्गावर टोलनाक्यांऐवजी कॅमेरे बसवले जाणार : नितीन गडकरी

आता राष्ट्रीय महामार्गावर टोलनाक्यांऐवजी कॅमेरे बसवले जाणार : नितीन गडकरी

नरेंद्र मोदी सरकार टोल प्लाझा हटवण्याचा विचार करत आहे आणि त्यांच्या जागी कॅमेऱ्यांद्वारे नंबर प्लेट स्कॅन करणारी प्रणाली विकसित करणार आहेत. ही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची योजना आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाके काढून त्याजागी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (ANPR) कॅमेरे बसवणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

गडकरी म्हणाले की, सरकारने 2019 मध्ये नियम केला की, सर्व गाड्यांवर कंपनीच्या नंबर प्लेट्स असतील. त्यानंतर “आता, टोल प्लाझा काढून कॅमेरे लावण्याची योजना आहे, जे या नंबर प्लेट्स वाचतील आणि टोल थेट चालकाच्या खात्यातून कापला जाईल.”

हेही वाचा: सुदैव म्हणा किंवा दुर्दैव पण मीच टोलटॅक्सचा जनक; गडकरींची प्रांजळ कबुली

टोलनाके हटवून त्याजागी एएनपीआर कॅमेरे बसवण्याची सरकारची नेमकी योजना काय आहे?

1. अहवालानुसार, कॅमेरे वाहनांच्या नंबर प्लेट्स वाचतील आणि वाहन मालकांच्या बँक खात्यातून स्वयंचलितपणे टोल शुल्क कापले जातील. टोलनाक्यांवरील प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी हे कॅमेरे बसवले जातील.

2. या कॅमेऱ्यांद्वारे सर्व नंबर प्लेट्स वाचता येतील का, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. 2019 नंतर आलेल्या नंबर प्लेट्सचीच या कॅमेऱ्यांद्वारे नोंदणी केली जाईल.

हेही वाचा: देशभरात टोल दर समान - गडकरी

3. तसेच गडकरींनी नमूद केल्याप्रमाणे, केंद्राने वाहनांना कंपनी-फिट नंबर प्लेट लावणे अनिवार्य करणारा नियम बनवला होता.

4. या प्रक्रियेत जुन्या नंबर प्लेट्स बदलण्यासाठी सरकारची योजना आहे, असे अहवालात म्हटले आहे.

5. त्याचबरोबर गडकरी म्हणाले की, या योजनेचा एक टप्पा चालू आहे आणि ही योजना सुलभ करण्यासाठी कायदेशीर सुधारणा देखील केल्या जात आहेत. जे टोल भरत नाहीत अशा चालकांना या योजनेमुळे चाप बसेल.

Web Title: Now Cameras Will Be Installed On National Highways Instead Of Toll Booths

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..