
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तानची वाताहात झालेली असताना आता भारतानं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. काही तासांपूर्वी चिनाब नदीवरील दोन धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळं यातून चिनाब नदीवर मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाला आहे. यामुळं पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडं भारताची रणनीती म्हणूनही पाहिलं जात असल्याचं काही माध्यमांनी म्हटलं आहे.