बिहारमधूनच जातीनिहाय जनगणनेला सुरुवात करा; राजभर यांची नितीश यांच्याकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish Kumar, Tejaswi Yadav and OP Rajbhar

बिहारमधूनच जातीनिहाय जनगणनेला सुरुवात करा; राजभर यांची नितीश यांच्याकडे मागणी

बालिया : सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून बिहारमधील नितीश कुमार यांच्या नवीन सरकारने त्यांच्या राज्यात जातीनिहाय जनगणना सुरू करण्याची मागणी केली आहे. (caste census news in Marathi)

राजभर यांनी या व्हिडिओ निवेदनात म्हटले की, जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेस यांच्याकडून भाजपला जातीनिहाय जनगणनेत अडथळा आणणारे म्हणायचे, पण आता या सर्व पक्षांचे सरकार आहे, त्यांनी जातीनिहाय जनगणना सुरू करावी, असंही राजभर यांनी म्हटलं.

राजभर म्हणाले, "बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचे सरकार स्थापन झाले आहे. कालपर्यंत आरजेडी, काँग्रेस, डावे आणि जेडीयूचे लोक म्हणायचे की भाजपचा अडथळा आहे, ते जातीनिहाय जनगणना होऊ देत नाहीत. आता तुम्ही स्वतंत्र झाला आहात. जर जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि डाव्यांचे सरकार असेल तर मी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव जी आणि मुख्यमंत्री नितीश जी यांना विनंती करेन की आता तुम्ही स्वतंत्र आहात आणि बिहारमधूनच जातीनिहाय जनगणना सुरू करा.