बिहारने देशाला कायम दिशा दाखवली; BJP च्या पाडावानंतर तेजस्वी यांचं विधान

Tejashwi Yadav and Narendra Modi
Tejashwi Yadav and Narendra Modi

पटना - जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये भाजपला सत्तेतून बाहेर करत नव्याने सत्ता स्थापन केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, यांनी मोठं विधान केलं. "देशाला ज्याची गरज होती ते बिहारने आजपर्यंत केले. बिहारने देशाला कायम मार्ग दाखवण्याचं काम केल्याचं तेजस्वी यांनी म्हटलं. नितीश कुमार यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर तेजस्वी यांनी हे विधान केलं आहे. (Tejashwi Yadav news in Marathi)

Tejashwi Yadav and Narendra Modi
ममता बॅनर्जी-नितीश कुमार आता मोदी राज संपवतील, शत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर हल्लाबोल

"आमचा लढा बेरोजगारीच्या विरोधात आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांना गरीब आणि तरुणांच्या वेदना ठावूक आहेत. आम्ही महिनाभरात तरुणांना बंपर नोकऱ्या देऊ, हे इतके भव्य असेल की यापूर्वी कधीही झाले नसेल, असही तेजस्वी यांनी म्हटलं. तसेच महाआघाडी इतकी मजबूत आहे की विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून फक्त भाजपच उरला असेल. भाजपकडून जातीय तणाव पसरवला जात आहे, ते प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचं तेजस्वी यांनी नमूद केलं.

Tejashwi Yadav and Narendra Modi
Shrikant Tyagi Case: श्रीकांत त्यागीच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

JD(U) नेते नितीश कुमार यांनी बुधवारी राजभवनात विक्रमी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी फारकत घेत महाआघाडीसोबत सरकार स्थापन केलं. यावेळी त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी हातमिळवणी केली. कुमार यांच्यासह तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com