आता पॅन कार्ड मिळणार फक्त 10 मिनिटांत!

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

सरकार पॅन / टॅन प्रोसेसिंग सेंटरची योजना आखत असून, ज्यामुळे रिअलटाइम किंवा जास्तीतजास्त 10 मिनिटांमध्ये ई-पॅन मिळू शकेल.

नवी दिल्ली : आता प्रत्येकाला पॅन 10 मिनिटांत मिळावं यासाठी प्राप्तिकर विभाग एका नवीन योजनेवर काम करत आहे. प्राप्तिकर विभाग ई-पॅन देण्याबाबत विचार करत आहे.  सरकार पॅन / टॅन प्रोसेसिंग सेंटरची योजना आखत असून, ज्यामुळे रिअलटाइम किंवा जास्तीतजास्त 10 मिनिटांमध्ये ई-पॅन मिळणार आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी लोकसभेत दिली. 

नवीन ई-पॅन कार्डविषयी 5 गोष्टी जाणून घ्या

-रिअल टाइम पॅन / टीएएन प्रोसेसिंग सेंटर (आरटीपीसी) भविष्यात आधारच्या माध्यमातून ई-केवायसीच्या मदतीने 0 मिनिटांमध्ये ई-पॅन देण्यावर काम करत आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी याविषयी बोलताना लोकसभेत सांगितले. 

- डिसेंबर 2018 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने (सीबीडीटी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ई-पॅन कार्ड इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म्हणजेच क्यूआर कोडसह पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे. 

- इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड (ई-पॅन) ई-केवायसीचा वापर करून प्राप्तिकर विभागाद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केले जाईल. ईमेलद्वारे पाठविलेले ई-पॅॅन एक डिजिटल स्वाक्षरी केलेले डॉक्युमेंट असणार आहे जे आपण पुरावा म्हणून देखील सादर करू शकणार आहे. 

- ई-पॅॅन सुविधा केवळ आधार कार्ड असलेल्या भारतीय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

-प्राप्तिकर विभाग देखील पायाभूत सुविधांमध्ये योग्य त्या सुधारणा करून प्रयत्न पॅन कार्ड वाटपाची प्रक्रिया अधिक जलद करणार आहे. सध्या प्रत्यक्ष पॅन कार्ड हातात येण्यासाठी लोकांना काही दिवस द्यावे लागतात. यामुळे पुढील आर्थिक कामांना उशीर होत असल्याने ई-पॅन देण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now PAN Card will get in 10 Minutes