esakal | आता ‘रेल्वे रोको’ ; शेतकरी संघटनेकडून १८ रोजी आयोजन |New Delhi
sakal

बोलून बातमी शोधा

 टिकैत

आता ‘रेल्वे रोको’ ; शेतकरी संघटनेकडून १८ रोजी आयोजन

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमांवर ११ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या वतीने येत्या १८ ऑक्टोबरला देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या दसऱ्याला (ता.१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात येईल, अशी घोषणा आंदोलनाचे नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव आदींनी केली.

लखीमपूर खेरी प्रकरणी संयुक्त किसान मोर्चाने दीर्घ देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. मंत्री मिश्रा यांनी या हत्याकांडाचे कारस्थान रचले व आता त्यांना मंत्रिपदावरून हटविले जात नाही याला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या स्मृत्यर्थ येत्या १२ ऑक्टोबरला प्रार्थना (अरदास) होईल. लखीमपूर घटनेतील मृत झालेल्या शेतकऱ्यांचा अस्थिकलश यात्रा उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहरात काढण्यात येईल. दसऱ्याच्या दिवशी मोदी-शहा यांचे प्रतिकात्मक पुतळ्यांचे देशात ठिकठिकाणी दहन करण्यात येईल. १८ ऑक्टोबरला (सोमवार) देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन केले जाईल. २६ ऑक्टोबरला किसान महापंचायत लखीमपूर येथेच होईल, असे सांगण्यात आले.

‘ती‘ तर केवळ प्रतिक्रिया: टिकैत

लखीमपूर भागात ४ शेतकऱ्यांच्या हत्याकांडानंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनात दोन भाजप कार्यकर्ते मारले गेले. त्यातील कथित दोषींना आपण दोषी मानतच नाही, असे वादग्रस्त विधान टिकैत यांनी केले. यादव म्हणाले, की शेतकरी असोत की कोणी कार्यकर्ते, कोणाचाही जीव जाणे दुर्दैवी आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.

loading image
go to top