'आता मोदी सरकारने 'हे' देखील मान्य करावं'; काय आहे राहुल गांधींची मागणी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi and narendra modi

'आता मोदी सरकारने 'हे' देखील मान्य करावं' : राहुल गांधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी काल देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे रद्द (Farm laws) करत असल्याची घोषणा केली. मागच्या वर्षभरापासून या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर (Singhu border) शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmer protest) सुरु होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज या निर्णयानंतर शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी सरकारला एका मोठ्या मुद्यावर झुकवल्यानंतर आता राहुल गांधी यांनी आणखी एक मागणी ट्विटरवरुन करुन सरकारला खोचक टोला लगावला आहे.

हेही वाचा: अन्नदात्याने सत्याग्रह करत अहंकाराला झुकवलं - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलंय की, आता चीनने भारतात गाव वसवल्याचं सत्य देखील सरकारने मान्य करायला हवं. भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाद सुरु आहे. दरम्यान, आता अरुणाचलमध्ये चीनने एक गावचं वसवल्याची धक्कादायक माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या गावात जवळपास 101 घरं असून 1 नोव्हेंबर 2020 रोजी हे फोटो काढण्यात आले आहेत. भारताच्या प्रत्यक्ष सीमारेषेपासून तब्बल 4.5 किलोमीटर अंतर आत हे गाव आहे. अरुणाचल प्रदेशमधील सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या काठावर आहे. या भागावरून दोन्ही देशांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. हे ठिकाण सशस्त्र युद्धाची जागा म्हणून मार्क केलं आहे. हिमालायच्या पूर्वेकडील रांगेत असलेलं हो गाव दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या काळातच वसवण्यात आलं आहे, असा दावा विरोधकांचा आहे. त्यावरुनच आता हे सत्य देखील मोदी सरकारने मान्य करावं, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

हेही वाचा: NCB विरोधात काय म्हणालं हायकोर्ट? आर्यनच्या जामीन आदेशातील दहा प्रमुख मुद्दे

कृषी कायदे रद्द केल्यानंतर काय म्हणाले राहुल गांधी?

"देशाच्या शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहासमोर अहंकारला झुकवलं आहे. अन्यायाच्या विरोधात झालेल्या या विजयाच्या शुभेच्छा! जय हिंद, जय हिंद का किसान" असं म्हणत राहूल गांधी यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. राहुल गांधी यांनी आपला एक जुना व्हीडिओ शेअर करत या भावना मांडल्या आहेत. या व्हीडिओमध्ये राहुल गांधी म्हणताय की, "माझे शब्द लक्षात ठेवा की सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल." त्यामुळे आता त्यांनी हा कायदा मागे घेतल्यानंतर राहुल गांधींकडून या शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं.

loading image
go to top