अन्नदात्याने सत्याग्रह करत अहंकाराला झुकवलं - राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

अन्नदात्याने सत्याग्रह करत अहंकाराला झुकवलं - राहुल गांधी

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना (Farmers Protest) होणाऱ्या विरोधानंतर आज केंद्र सरकारने अखेर कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ही घोषणा केली असून, लवकरच त्यांनी याबद्दल संविधानीक प्रक्रिया पुर्ण करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरातून याबद्दल वेगवेळ्या प्रतिक्रिया समोर येत असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज या निर्णयानंतर शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा: "उशीरा सुचलेलं शहाणपण", मोदींच्या घोषणेवर मलिकांची प्रतिक्रिया

"देशाच्या शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहासमोर अहंकारला झुकवलं आहे. अन्यायाच्या विरोधात झालेल्या या विजयाच्या शुभेच्छा! जय हिंद, जय हिंद का किसान" असं म्हणत राहूल गांधी यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. राहुल गांधी यांनी आपला एक जुना व्हीडिओ शेअर करत या भावना मांडल्या आहेत. या व्हीडिओमध्ये राहुल गांधी म्हणताय की, "माझे शब्द लक्षात ठेवा की सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल." त्यामुळे आता त्यांनी हा कायदा मागे घेतल्यानंतर राहुल गांधींकडून या शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं.

हेही वाचा: काय होते 3 कृषी कायदे आणि आक्षेप? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हा निर्णय घेतला. देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूनानक जयंतीचं औचित्य साधून देशवासीयांची माफी मागत हा निर्णय घेतला आहे.

loading image
go to top