क्रेडिट कार्डने घरभाडं भरताय...

डिजिटलायझेशनमुळे अनेक बँकांच्या क्रेडिट कार्डवर घर भाडे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
Credit Card
Credit Cardsakal

पुणे : दुकानातील खरेदीसाठी किंवा एखाद्या गोष्टीचे बिल भरण्यासाठी तुम्ही बँकेचे डिबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर नक्कीच करत असाल. (Now You Can Pay rent Through Credit Card ) मात्र, वाढत्या डिजिटलायझेशनच्या युगात अनेक बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारेदेखील घर भाडे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, असे करताना त्याचे काही फायदे आणि तोटे देखील आहेत. (Advantage & Disadvantage of Credit Card Use )

Credit Card
'क्रेडिट कार्ड'च्या जाळ्यात अडकलात? जाणून घ्या बाहेर पडण्याचा मार्ग

क्रेडिट कार्डने भाडे भरण्याचे तोटे

घराचे किंवा दुकानाचे भाडे (House And Shop rent through credit card ) भरण्यासाठी तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर यासाठी तुम्हाला दोन टक्क्यांपर्यंत वाढीव शुल्क भरावे लागेल. म्हणजे समजा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे 15 हजार रुपये भाडे भरणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 200 रुपयांपर्यंत अधिक शुल्क भरावे लागू शकते. तर हेच भाडे तुम्ही रोख अथवा डेबिट कार्डने भरली अथवा ऑनलाईन ट्रान्सफर केल्यास यासाठी तुम्हाला कुठली अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. (Charges of Credit Card)

क्रेडिट कार्डद्वारे घर भाडे भरण्याचे फायदे

जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे अथवा दुकानाचे भाडे भरत असाल तर तुम्हाला 45 दिवसांचा कालावधी मिळतो. वरील 15 दिवसांच्या कालावधीसाठी कोणतेही व्याज भरावे लागत नाही. ज्या पद्धतीने बँकेतील ठेवींवर ज्याप्रमाणे तुम्हाला व्याज मिळते त्याप्रमाणे तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डावर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खर्च केल्यानंतर तुमचे वार्षिक देखभाल शुल्क परत केले जाते. त्यामुळे तुम्हीदेखील घराचे किंवा दुकानाचे भाडे क्रेडिट कार्डने भरत असाल तर तुम्हालादेखील मिळाणाऱ्या या सर्व सुविधांचा फायदा नक्कीच मिळू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com