खुशखबर! आता मिळणार मोफत इंटरनेट

वृत्तसंस्था
Thursday, 8 August 2019

15 जीबी डाटाही मिळणार

या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डाटा दरमहिन्याला वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून, पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे.

नवी दिल्ली : राज्यात येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) केली. निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ही घोषणा नसून, आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीमुळे महिलांची सुरक्षा होत असून, चोरीसारख्या घटनांना आळाही बसत आहे.  

याशिवाय दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार आहेत. 4 हजार हॉटस्पॉट हे शहरातील 4 हजार बस स्टॉपवर बसविण्यात येतील. उर्वरीत 7 हजार वायफाय हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 याप्रमाणे बसविले जातील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. 

15 जीबी डाटाही मिळणार

या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डाटा दरमहिन्याला वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून, पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now you will get free internet in Delhi Decision by Kejriwal Government