
juli devi soap brand
esakal
बिजनौर जिल्ह्यातील राजा रामपूर खादर नावाचे एक छोटेसे गाव. याच गावात राहणाऱ्या जुली देवी यांचे जीवन राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनने पूर्णपणे बदलून टाकले. एकेकाळी चूल आणि मूल यात अडकलेल्या जुली देवी आज राष्ट्रीय स्तरावर एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांच्या यशाची कहाणी खूप स्पेशल आहे, कारण त्यांनी चक्क बकरीच्या दुधापासून नैसर्गिक साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय.