‘एनएसई’ गैरव्यवहारप्रकरणी छापासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI
‘एनएसई’ गैरव्यवहारप्रकरणी छापासत्र

‘एनएसई’ गैरव्यवहारप्रकरणी छापासत्र

नवी दिल्ली - नवी दिल्ली - राष्ट्रीय शेअर बाजारीताल को लोकेशन (एनएसई) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) आज देशाच्या विविध भागांमध्ये दहाहून अधिक ठिकाणी छापे घातले. दिल्ली, मुंबई, कोलकाता, गांधीनगर, नोएडा आणि गुरुग्राममध्ये या प्रकरणाशी संबधित दलालांचा शोध घेण्यात आला. गेल्या महिन्यात, सीबीआयने ‘एनएसई’च्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे माजी मुख्य संचालन अधिकारी आनंद सुब्रमण्यन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

सीबीआयने सुब्रमण्यन यांना फेब्रुवारीमध्ये अटक केली आणि त्यानंतर लगेचच चित्रा रामकृष्ण यांनाही अटक करण्यात आली. भांडवल बाजार नियामक सेबीने या दोन आरोपींसह इतरांवर विविध गुन्ह्यांबाबत दंड आकारण्याच्या कारवाई केल्यानंतर ही अटक करण्यात आली. प्राप्तिकर विभागाने चेन्नई आणि मुंबईतही झडती घेतली होती.

संजय गुप्ता यांच्या मालकीची दिल्लीस्थित ब्रोकर फर्म ओपीजी सिक्युरिटीज आणि इतर काहींनी डेटा सेंटर कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून २०१० ते २०१४ या कालावधीत एनएसई सर्व्हर डेटामध्ये प्राधान्य मिळवण्यासाठी अल्गोरिदमिक ट्रेडिंग सॉफ्टवेअरचा वापर केल्याचा आरोप करत मे २०१८ मध्ये गुन्हा नोंदला होता. सहआरोपी अजय नरोत्तम शहा याने एनएसईच्या व्यापार डेटाच्या आधारे अल्गोरिदमिक सॉफ्टवेअर विकसित केले होते.

ईमेलच्या छाननीनंतर तपासाला वळण

चित्रा रामकृष्ण आणि तथाकथित ‘हिमालयीन योगी’ यांच्यातील ईमेलची छाननी केल्यानंतर, त्यांच्या निर्देशानुसार त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला नवीन वळण मिळाले.

Web Title: Nse Malpractice Case Red

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CBIdelhiMumbaiKolkata
go to top