NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

NTA plans independent observers for exam security: NEET, JEE सारख्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र निरीक्षकांची कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची तयारी एनटीएकडून सुरू आहे.
NTA Reform

NTA Reform

esakal

Updated on: 

New Delhi: नीट परीक्षेतील (NEET) पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आता नवी कायमस्वरुपी व्यवस्था उभारण्याची तयारी सुरू केली आहे. देशभरातील परीक्षा केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र निरीक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती केली जाणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव एनटीएने मांडला आहे. यासाठी निवृत्त लष्करी आणि निमलष्करी दलातील अधिकारी, केंद्र व राज्य सरकारी अधिकारी, तसेच सरकारी शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक आणि प्राध्यापकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

Loading content, please wait...