Panipat
Panipat

नुहप्रमाणेच पानिपतमध्येही गोंधळ! तिरंगा यात्रा काढणारे तरुण मशिदीत घुसले; इमामांनी...

नवी दिल्ली - नूह येथील हिंसाचारानंतर 15 ऑगस्ट रोजी हरियाणातील पानिपतमधील वातावरण बिघडण्यापासून थोडक्यात बचावले. येथे तिरंगा यात्रेदरम्यान काही तरुणांनी मशिदीबाहेर गोंधळ घातला. यावेळी त्यांनी धार्मिक घोषणा दिल्या. इतकंच नाही तर यावेळी डीजेही वाजवण्यात आला. विशेष म्हणजे, मशिदीत आधीच झेंडावंदन करण्यात आलं होतं.

Panipat
कौरव-पांडव भाऊ-भाऊच होते, पण युद्धात धर्म-अधर्माचा निर्णय घेता आला पाहिजे; सावंत यांचं विधान

तिरंगा यात्रेदरम्यान काही तरुण मशिदीत घुसले होते. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेवर मशिदीबाहेर गोंधळ घातल्याचा आरोप आहे. यानंतर मशिदीच्या इमामांनी डीजीपींना पत्र लिहून कारवाईची मागणी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली.

मशिदीचे इमाम म्हणाले की, तैयब सुरैया यांनी तिरंगा बनवला होता. या ध्वजावर सर्वांना समान अधिकार आहे. ते पुढं म्हणाले की, सकाळी सहा वाजता आम्ही मशिदीवर तिरंगा फडकवला होता. एवढच नाही तर आम्ही डोक्यावर तिरंगा बांधायलाही तयार आहोत.

Panipat
मलिक माझे सहकारी, आमच्या दोघांच्या डिग्री 'रिटर्न फ्रॉम जेल'; भुजबळांची मिश्कील टिप्पणी

तक्रार मिळाल्यानंतर डीएसपी म्हणाले की, आम्ही वातावरण बिघडू देणार नाही. सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिस कडक कारवाई करतील. सध्या मशिदीबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याआधी 31 जुलै रोजी मेवात-नूह येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. काही वेळातच यात्रेवर दगडफेक सुरू झाली आणि दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात अनेक गाड्या जाळण्यात आल्या होत्या. यादरम्यान सायबर स्टेशनवरही हल्ला करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com