Corona Updates: रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात अव्वल; रुग्णसंख्येतही घट

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 22 September 2020

देशात कोरोनाचा कोरोना रुग्णांची संख्या सप्टेंबर महिन्यात वाढताना दिसतेय. या परिस्थितीतही आता एक चांगली बातमी आली आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कोरोना रुग्णांची संख्या सप्टेंबर महिन्यात वाढताना दिसतेय. या परिस्थितीतही आता एक चांगली बातमी आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी देशात रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत आहेत. जगात सध्या भारत रिकव्हरी रेटमध्ये अव्वल स्थानी पोहचला आहे.

भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट तब्बल 80 टक्क्यांच्या वर गेला आहे. मागील सलग 3 दिवसांत देशात प्रतिदिन 90 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आता कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.

19 सप्टेंबरला देशात कोरोनाचे 93 हजार 337 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले होते तर त्यादिवशी 95 हजार 880 जण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 20 सप्टेंबरला 92 हजार 605 कोरोना रुग्णांचं निदान झालं होतं तर त्याच दिवशी 94 हजार 415 जणांनी कोरोनावर मात केली होती. तसेच काल (सोमवारी) 21 सप्टेंबरला कोरोनाचे देशात 86 हजार 961 रुग्ण आढळले आहेत, तर दिलासादायक बाब म्हणजे 93 हजार 356 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. 

आंदोलनाचे एकच धोरण असू शकतं; सर्वोच्च न्यायालयाचं मत

 देशात कोरोना रुग्णांचा आकडा 55 लाखांच्या वर गेला आहे. तर आतापर्यंत देशभरात कोरोनाच्या 88 हजार 858 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत देशात 86 हजार 961 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.   

IG Nobel मिळालेले मोदी दुसरे पंतप्रधान

 मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 9 लाख 33 हजार 158 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशभरात 6 कोटी 53 लाख 25 हजार 779 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने ( Indian Council of Medical Research) दिली आहे. 
 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona free patients is higher than number of new patients over past three days in india