esakal | IG Nobel मिळालेले मोदी भारताचे दुसरे पंतप्रधान
sakal

बोलून बातमी शोधा

modi ig nobel

मोदींनाच नाही तर त्यांच्यासोबत जगातील दिग्गज नेत्यांनासुद्धा आयजी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यात अमेरिका, ब्राझीलसह, ब्रिटनच्या प्रमुख नेत्यांची नावे आहेत.

IG Nobel मिळालेले मोदी भारताचे दुसरे पंतप्रधान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची बातमी गेल्याच आठवड्यात आली होती. त्याची चर्चा सुरु असतानाच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पुरस्कार देण्यात आला आहे. तो पुरस्कार म्हणजे IG नोबेल पुरस्कार. खरंतर हा एक उपाहासात्मक किंवा व्यंगात्मक असा पुरस्कार आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये तो दिला जातो. 

नोबेल पुरस्कार हा विविध क्षेत्रात भरीव आणि उल्लेखनीय अशा कामगिरीसाठी दिला जातो. त्याऊलट आयजी नोबेल पुरस्कार हा कमी महत्वाच्या वैज्ञानिक संशोधनासाठी दिला जातो. अनल्स ऑफ इम्पोर्टेबल रिसर्चच्या विनोदी पाक्षिकाकडून हा पुरस्कार जाहीर केला जातो. ज्या व्यक्ती काहीतरी जगावेगळं करतात आणि एखादी व्यंगात्मक परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात त्यांना हा पुरस्कार जाहीर केला जातो. अर्थातच ही मानाची बाब नाही त्यामुळे त्याकडे कोणी फारसं लक्ष देत नसलं तरी चर्चा मात्र जोरात होते. 

हे वाचा - भारताच्या आघाडीमुळे खवळला चीन, तिबेटमध्ये युद्धसराव करत डागली मिसाईल

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
आयजी नोबेल पुरस्कार घोषित झालेले मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत. त्यांच्याआधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना 1998 ला अणुस्फोटाच्या चाचणीनंतर जाहीर झाला होता. अणुचाचणी करून जगात शांतता नांदावी म्हणून भारत अण्विकदृष्ट्या स्वावलंबी झालं असं त्यांनी केलेल्या भाषणात म्हटलं होतं. तेव्हा शांततेचा पुरस्कार आक्रमकपणानं केला म्हणून त्यांना आयजी नोबेल हा व्यगात्मक पुरस्कार दिला होता. 

मोदींना पुरस्कार देण्याचं कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आयजी पुरस्कार का दिला याबाबत सांगताना मॅगझिनने म्हटलं की, सध्या देशातील बेरोजगारी, कोरोनाच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूची आकडेवारी यावरून विरोधकांनी त्यांना घेरलं आहे. तरीही त्याकडे लक्ष न देता मोदींनी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपायांची ज्या पद्धतीने जाहीरात केली आणि जनजागृती करण्यात यश मिळवलं त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर केला जात आहे. कोरोनाच्या साथीबाबत वैद्यकीय जनजागृतीबद्दल मोदींची निवड केली असल्याचंही मॅगझिनने सांगितलं. शास्त्रज्ञ किंवा डॉक्टरांपेक्षाही चांगले प्रयत्न करून कोरोनाच्या या संकटकाळात जीवन मृत्यूवर परिणाम होतील असे काम केल्याबद्दल त्यांना पुरस्कार दिल्याचं सांगण्यात आलं आहे. 

हे वाचा - नौदलाचं ऐतिहासिक पाऊल; युद्धनौकेवर पहिल्यांदाच महिला अधिकारी तैनात

जगातील अनेक नेत्यांचा समावेश
फक्त मोदींनाच नाही तर त्यांच्यासोबत जगातील दिग्गज नेत्यांनासुद्धा वैद्यकीय जनजागृतीसाठी हा पुरस्कार जाहीर केला आहे. यात अमेरिका, ब्राझील, ब्रिटनच्या पंतप्रधानांची नावे आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, तुर्कस्तानचे राष्ट्रपती रजब तैयब एदुर्गान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही यामध्ये समावेश आहे.