esakal | देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 15.83 लाखांवर तर मृतांची संख्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus1

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

- कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 15 लाखांवर

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 15.83 लाखांवर तर मृतांची संख्या...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना व्हायरस अमेरिका, ब्राझील, भारतासह आता जगभरात थैमान घालत आहे. भारतातही याचा आकडा मोठा आहे. भारतात आत्तापर्यंत 15,83,792 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या यापूर्वी इतर देशांच्या तुलनेने कमी होती. मात्र, आता त्यामध्ये वाढ झाली आहे. तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. देशभरात सध्या 15,83,792 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 34,968 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 10,20,582 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

भारत जगात तिसऱ्या स्थानावर

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर गेला आहे. तर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमेरिकेचे रुग्णसंख्येबाबतीत स्थान कायम आहे. 

महाराष्ट्र, तमिळनाडू राज्यात रुग्ण वाढताहेत

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, आंध्र प्रदेश या राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 4,00,651, तमिळनाडूत 2,34,114 तर राजधानी दिल्लीत 1,33,310 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. . 

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 4,00,651 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 14,463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मागील काही दिवसांत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. 2,39,755 रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय 1,46,433 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.