esakal | भूकंपाच्या धक्क्यांची भारतात वाढती संख्या; गेल्या वर्षभरात बसले ९६५ धक्के
sakal

बोलून बातमी शोधा

भूकंपाच्या धक्क्यांची भारतात वाढती संख्या; गेल्या वर्षभरात बसले ९६५ धक्के

नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजीने (एनसीएस) विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाला दिलेल्या ताज्या अहवालानुसार भारतात अलीकडच्या काळातील भूकंपाचे सर्वाधिक धक्के मागच्या एका वर्षांत जाणवले.

भूकंपाच्या धक्क्यांची भारतात वाढती संख्या; गेल्या वर्षभरात बसले ९६५ धक्के

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह एनसीआर भागात शुक्रवारी रात्री जाणवलेल्या भूकंपामुळे चांगलीच घबराट उडाली. दिल्लीला २०२१ मध्ये बसलेला हा भूकंपाचा पहिलाच धक्का असला तरी, कोरोनाच्या वैश्‍विक संकटाच्या वर्षात भारतात मागील वर्षी (२०२०) तब्बल ९६५ वेळा, म्हणजे सरासरी एका दिवसातून तीन वेळा भूकंपाचे झटके जाणवल्याचे वास्तव समोर आले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शुक्रवारच्या भूकंपाची तीव्रता ६.१ होती. हे धक्के गंभीर या श्रेणीत मोडत असल्याचे भूगर्भ वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजीने (एनसीएस) विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाला दिलेल्या ताज्या अहवालानुसार भारतात अलीकडच्या काळातील भूकंपाचे सर्वाधिक धक्के मागच्या एका वर्षांत जाणवले. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात देशात ९६५ वेळा पृथ्वी थरथरली व दिल्ली एनसीआर भागात किमान १३ मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. ही संख्या यापेक्षाही जास्त असण्याची दाट शक्‍यता आहे, कारण ‘एनसीएस’ने दिलेल्या आकड्यात केवळ ३ रिश्‍टर स्केल किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेच्या धक्‍क्‍यांचीच नोंद घेतली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मागील वर्षी अनलॉकच्या काळात चीनमधील शिनजिआंग येथे केंद्रबिंदू असलेला व सर्वाधिक तीव्रतेचा ६.४ रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. शुक्रवारच्या इतक्‍या तीव्रतेचे धक्के भारतात मागील वर्षी दोनदा जाणवले. २५ वेळा ५.०० ते ६.०० इतक्‍या तीव्रतेचा व ३५५ वेळा ४ ते ५ तीव्रतेचे भूंकप भारतात झाले.