esakal | लष्कराला मोठं यश; हिज्बुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

army

हे अत्यंत यशस्वी ऑपरेशन असल्याची प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली आहे. 

लष्कराला मोठं यश; हिज्बुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरचा खात्मा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

श्रीनगर- जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या जॉईंट ऑपरेशनमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरचा आणि A++ दर्जाचा दहशतवादी सैफुल्लाह याचा खात्मा करण्यात आला आहे. ही चकमक श्रीनगरच्या रंगहेथ भागात झाली. यानंतर लष्कराने याठिकाणी मोठ्या प्रमाणात जवानांची तैनाती केली आहे. हे अत्यंत यशस्वी ऑपरेशन असल्याची प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली आहे. 

सैफुल्लाह (slain Hizbul Mujahideen terrorist) हा 2014 पासून सक्रिय होता. त्याने बुरहान वाणीसोबत काम केले आहे. सुरक्षा दल गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर लक्ष ठेवून होते. रियाझ नायकूच्या खात्म्यानंतर हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये प्रमुख कमांडर राहिला नव्हता. त्यानंतर सैफुल्लाहाने आपली कारवाई सुरु ठेवली होती, असं दिलबाग सिंग म्हणालेत. यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 200 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले.