देशात चोवीस तासांत पडली एवढ्या रुग्णांची भर; किती ते वाचा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 मे 2020

भीती खरी ठरली
‘एम्स’चे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, जून आणि जुलैमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक उद्रेक होईल. त्यांची भीती खरी ठरण्याचे संकेत मे महिन्याच्या उत्तरार्धातच मिळू लागले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा आकडाही ४५ हजार २९० पर्यंत पोहोचला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या आणि मृतांच्या संख्येमध्ये  रोज विक्रमी वाढ सुरूच असून मागील चोवीस तासांत, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वाधिक  ६ हजार ६५४ नवीन रुग्ण आढळले असून १३७ लोकांनी प्राण गमावले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरीकडे आज संध्याकाळी चारपर्यंत आलेल्या सुधारित आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये देशात आणखी २८ जणांनी प्राण गमावले आहेत. त्यात राजधानी दिल्लीतील सर्वाधिक २३ जणांचा समावेश आहे  दिल्ली सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही दिल्लीतील मृतांचा आकडा वाढला आहे. देशात १५ मेपर्यंत कोरोना रुग्णवाढीचा दर ९ टक्क्यांवर येईल हा पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील विशेष गटाचा अंदाज प्रत्यक्षात उलटाच ठरला असून १५ मे नंतरच देशात दररोज नवे कोरोनाग्रस्त आणि मृत्युमुखी पडणारे यांच्या संख्येत भयावह वाढ झाल्याचे चित्र आहे.

कोरोनाचे थैमान सुरुच; 144 नवे रुग्ण आढळले

मे महिन्यातील उद्रेक : (दर २४ तासांमधील आकडेवारी)
१६ मे - ४७९४
१७ मे ५०४९ 
१८ मे ५०६५ 
१९ मे ६१५४
२० मे ५५४७
२१ मे ६०२५.
२२ मे ६६५४


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of patients increase in the countryl in twenty four hours