
इस्लामच्या तत्वानुसार नुपूर शर्माला माफ करायला हवं; मुस्लिम संघटनेचं आवाहन
नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलेल्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना इस्लामच्या तत्वानुसार माफ करायला हवं, असं जमात उलेमा ए-हिंद या संघटनेनं म्हटलं आहे. या प्रकरणावरुन देश सध्या मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक भागात हिंसाचाराच्या घटना देखील घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर 'जमात'नं आपल्या समाज बांधवांना हे आवाहन केलं आहे. (Nupur Sharma should be forgiven as per Islam says Jamaat Ulama e Hind)
जमातचे अध्यक्ष सुहैब कासमी रविवारी पत्रकार परिषदेत म्हणाले, मुस्लिम स्कॉलर्सच्या आमच्या संघटनेला देशभरात सुरु असलेला निषेध मान्य नाही. इस्माल म्हणतो की नुपूर शर्माला माफ केलं जावं. त्याचबरोबर या संघटनेनं भाजपच्या निर्णयाचं स्वागत केलं की त्यांनी नुपूर शर्माला निलंबित केलं. भारतात कायद्याचं राज्य असून आम्ही कायद्याचं स्वागत करतो. त्यामुळं आम्ही कायदा हातात घेणार नाही. कायदा आम्हाला रस्त्यावर उतरुन नियम तोडायला परवानगी देत नाही.
हेही वाचा: पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा पुन्हा राडा; भागवत कराडांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
जमातनं फतवा काढलाय की, लोकांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला पाठिंबा देऊ नये. यानंतर ते असदुद्दीन ओवैसी आणि मोहम्मद मदानी यांच्याविरोधात फतवा काढणार आहेत. त्याचबरोबर जमातनं सरकारला आवाहनं केलंय की मुस्लिम संघटना आणि त्यांना फंडिंग करणाऱ्यांची चौकशी करावी. ज्यामुळं मुस्लिम संघटनांकडून होणारा हिंसाचार रोखला जाईल.
Web Title: Nupur Sharma Should Be Forgiven As Per Islam Says Jamaat Ulama E Hind
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..