वादग्रस्त विधान करून नुपूर शर्मा बेपत्ता? मुंबई पोलिसांकडून दिल्लीत शोध सुरू | Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nupur sharma news

वादग्रस्त विधान करून नुपूर शर्मा बेपत्ता? मुंबई पोलिसांकडून दिल्लीत शोध सुरू

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) समन्स बजावले आहे. मात्र, अद्यापपर्यंत शर्मा पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झालेल्या नाही. त्यामुळे वादग्रस्त विधान करून नुपूर शर्मा अखेर कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून गेल्या चार दिवसांपासून दिल्लीमध्ये (Delhi) शोध घेतला जात असून, शर्मा ट्रेसेबल असल्याचे सांगितले जात आहे. रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करत शर्मा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबत इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केले आहे. (Nupur Sharma Controversy)

हेही वाचा: प्रेषित मोहम्मद-नुपूर शर्मा वाद चिघळला; अल-कायदापाठोपाठ IS ची थेट भारताला धमकी

महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या सूत्रांनुसार, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. परंतु, त्या नॉट ट्रेसेबल असल्याने त्यांचा शोध घेता येत नाहीये. वादग्रस्त विधानानंतर शर्मा यांच्या विरोधात मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय ठाणे पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, शर्मा यांना समन्स बजावल्यानंतर योग्य कारवाईसाठी दिल्ली पोलीस सहकार्य करत नसल्याचे म्हटले असून, शर्मा यांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहे. या कामामध्ये दिल्ली पोलिसांनीही सहकार्य कारावे असेही वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: 'नुपूर शर्मा' वक्तव्यावर पाकिस्तानातून प्रतिक्रिया; व्यंकटेश प्रसाद म्हणाला..

काय आहे प्रकरण?

एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर देशभरात शर्मांविरोधात निदर्शने करण्यात आली होती. याशिवाय कतार, पाकिस्तान, इराण, इराकसह 14 देशांनी शर्मा यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली होती. शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजपकडून नुपूर यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे.

Web Title: Nupur Sharmauntraceable After Comments On Prophet Says Maharashtra Govt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top