
कर्नाटकातून एक प्रकार समोर आला आहे. जो जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. एका सरकारी रुग्णालयात, एका मुलावर शस्त्रक्रिया केल्यानंतर, एका परिचारिकेने त्याच्या जखमेला टाके न घालता फेविक्विकने चिकटवले. जेव्हा मुलाच्या कुटुंबाने यावर प्रश्न विचारला तेव्हा नर्सने सांगितले की, ती वर्षानुवर्षे हे करत आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र, आता त्या नर्सला निलंबित करण्यात आले आहे.