...म्हणून नर्सने पाजलं नवजात बाळाला दूध

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जून 2020

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर, पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी अहोरात्र काम करत आहेत. पण, येथील एका नर्सने आपली सेवा करतानाच एका नवजात बाळाला दूध पाजले आहे.

कोलकाता: जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर, पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी अहोरात्र काम करत आहेत. पण, येथील एका नर्सने आपली सेवा करतानाच एका नवजात बाळाला दूध पाजले आहे. संबंधित नर्सवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्रातून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह खाल्ला उंदरांनी...

शहरामधील एका रुग्णालयात एक महिलेने बाळाला जन्म दिला. महिलेची सिजेरिअन डिलिव्हरी झाली होती. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे आईला बाळाला दूध पाजता आले नाही. नवजात बालक भुकेने व्याकुळ झाले होते. यामुळे रुग्णालयात काम करत असलेल्या नर्सला दाटून आले आणि बाळाला दूध पाजले. नर्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.

...अन् 'त्या' व्हिडिओमुळे सापडले वडील!

रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला, तेथे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे वैद्यकिय कर्मचाऱ्यांपासून ते नवजात बाळांपर्यंत सर्वांची जास्त काळजी घेतली जाते. कोरोनाचा प्रसार होण्याची भीती लहान नवजात बालकांमध्ये जास्त असल्यामुळे या बाळाच्या घरच्यांनी त्याला हात लावला नाही. त्यामुळे भीतीपोटी या बाळाला दूधही पाजले. बाळ रडत असल्यामुळे नर्सने दूध पाजले. या नर्सला आठ महिन्यांचा मुलगा असून, अशा परिस्थितीतही त्या बाळाला सोडून आपले कर्तव्य बजावत आहेत. यापरिचारिकेनं हायजीन प्रोटोकॉल पाळत या बाळाला दूध पाजलं. या घटनेनंतर सर्वत्र या परिचारिकेच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nurse was breast feeding new born baby after his mom couldnt at kolkata