
परिचारिकांच्या तक्रारीवरून राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास आयुक्तांकडं सोपवलाय.
रात्री दारू पिऊन डॉक्टर आमच्या चेंजिंग रूममध्ये येतात अन्... परिचारिकांचा धक्कादायक आरोप
भोपाळ : मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधील (Bhopal) सर्वात व्यस्त आणि मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या हमीदिया रुग्णालयाचे (Hamidia Hospital) अधीक्षक डॉ. दीपक मरावी यांच्यावर रुग्णालयातील परिचारिकांनी (Nurse) धमकावण्याचा आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप केलाय. डॉक्टर मरावी रात्री दारू पिऊन त्यांच्या चेंजिंग रूममध्ये येतात आणि अश्लील हावभाव करतात, असाही आरोप परिचारिकांनी केलाय.
दरम्यान, परिचारिकांच्या तक्रारीवरून राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास आयुक्तांकडं सोपवलाय. त्यांना या प्रकरणाचा तपास 10 दिवसांत पूर्ण करण्यास सांगण्यात आलंय. यावेळी आरोप करणाऱ्या काही कर्तव्यदक्ष परिचारिकांनी सांगितलं की, 'जेव्हापासून डॉक्टर मरावी रुग्णालयाचे अधीक्षक झाले आहेत, तेव्हापासून परिचारिकांचं काम अवघड झालंय. डॉक्टर मरावी रात्री दारू पिऊन त्यांच्या चेंजिंग रूममध्ये येतात. तर, काही वेळा ते दार न ठोठावता आत येतात आणि घाणेरडे व अश्लील हावभाव करतात.' डॉ. मरावी यांनीही अनेक परिचारिकांशी असभ्य वर्तन केल्याचा त्यांचा आरोप आहे.
हेही वाचा: प्रेषित मोहम्मद-नुपूर शर्मा वाद चिघळला; अल-कायदापाठोपाठ IS ची थेट भारताला धमकी
डॉक्टर मरावी सुट्टी देण्याच्या बहाण्याने आणि ओव्हरटाईमच्या बहाण्याने आपल्या चेंबरमध्ये बोलावून अश्लील बोलतात, असंही परिचारिकांनी सांगितलं. एखाद्या परिचारिकेनं विरोध केला तर ते राजकीय संबंधांबद्दल बोलून धमक्या देतात. एका नर्सनं सांगितलं की, डॉ. मरावी यांनी 30 मे रोजी तिला त्यांच्या ऑफिसच्या शेजारी असलेल्या खोलीत बोलावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. परिचारिकेनं विरोध केल्यावर मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. नोकरी करू देणार नाही आणि नोकरी काढून घेईन, अशी धमकीही दिली होती.
हेही वाचा: PUBG हत्याकांडात नवा ट्विस्ट; आईच्या हत्येनंतर आरोपी मुलगा कोणाला भेटायला गेला होता?
वैद्यकीय मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
परिचारिकांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांच्याकडं लेखी तक्रार केलीय. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी विभागीय आयुक्त गुलशन बामरा यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलंय. या प्रकरणाची चौकशी 10 दिवसांत पूर्ण करण्याची मागणी मंत्र्यांनी आयुक्तांकडं केलीय. हमीदिया रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दीपक मरावी यांच्यावर सामान्य वर्गाविरोधात जातीयवादी टिप्पणी केल्याचाही आरोप आहे.
Web Title: Nurses Of Hamidia Hospital Of Bhopal Accused Medical Superintendent Madhya Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..