
नवी दिल्ली - राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे. आतापर्यंत न्यायालयात चार वेळा सुनावणी झाली आहे. मात्र त्यातून काहीही निकाल लागला नाही. आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पार पडली. मात्र ठोस निकाल आलाच नाही. आता सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यातच आता सरन्यायाधीश एन.व्ही. रमना हे निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शिंदे-ठाकरे वाद रेगाळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रमना हे ऑगस्टमध्येच निवृत्त होणार आहेत. केंद्र सरकारने देखील त्यांना पुढील सरन्यायाधीश कोण असतील अशी विचारणा केली. त्यामुळे सध्या सुनावणी होत असलेल्या शिंदे-ठाकरे याचिकांवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रमना यांच्या खंडपीठासमोर ठाकरे-शिंदे गटांच्या पाच याचिकांवर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत चार वेळा सुनावण्या झाल्या आहेत. मात्र कोणताही निर्णय झालेला नाही.
रमना येत्या २७ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहे. त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उद्या उमेश ललित यांच्या नावाची शिफारस केली आहे. केंद्र सरकारकडून रमना यांना गुरुवारीच विचारणा करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी ललित यांचं नाव सुचवलं आहे. दरम्यान शिंदे-ठाकरे गटाची पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. एकूणच न्यायालयात सध्या तारीख पे तारीख सुरू आहे. तर रमन्ना यांनी देखील ठाकरे-शिंदे गट प्रकरण पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपविण्याचे सुतोवाच केले आहेत. आता रमना यांच्या निवृत्तीचा दिवस जवळ येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पेच रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे रमना याच महिन्यात निवृत्त होणार असून ते कारकिर्दीच्या शेवटी मोठा अथवा वादग्रस्त निर्णय घेणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे रमना यांनी निर्णय पाच सदस्यीय खंडपीठाकडे पाठवला तर ही प्रक्रिया होण्यास मोठा वेळ लागेल. त्यातच नव्या सरन्यायाधीशांची एंट्री झाल्याने ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, अस तज्ञांना वाटतं.