
ममता बॅनर्जींच्या साहित्यसेवेवर आक्षेप
कोलकता : बंगाली लेखिका आणि लोकनृत्य संशोधक रत्ना रशीद बॅनर्जी यांनी पश्चिमबंग बांगला अकादमीने दिलेला पुरस्कार मंगळवारी परत केला आहे. या संस्थेने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा साहित्यातील योगदानासाठी विशेष गौरव केला. त्यावरून साहित्यविश्वात नाराजीचा सूर उमटला.
रवींद्रनाथ टागोर यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त सोमवारी राज्य सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पश्चिमबंग बांगला अकादमीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नवा विशेष साहित्य पुरस्कार जाहीर केला आहे. ‘कविता बितन’ या ९०० कवितांचा समावेश असलेल्या संग्रहासाठी मुख्यमंत्र्यांची पहिल्याच पुरस्कारासाठी निवड झाली. याच्या निषेधार्थ रत्ना बॅनर्जी यांनी २०१९मध्ये मिळालेला अन्नदा शंकर स्मारक सन्मान पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.
टीकेचे सूर
ममता बॅनर्जी यांना साहित्य पुरस्कार देण्यावरून बंगालमधील साहित्य क्षेत्रातून रोष व्यक्त होत आहे. पुरस्काराच्या निषेधार्थ बंगाली भाषा अकादमीच्या सल्लागार मंडळाचे अनादीरंजन विश्वास यांनी राजीनामा दिला. लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही त्यांच्या फेसबुकवरून टीका केली. सर्वत्र टीका होऊ लागल्याने एक लाख रुपयांचा हा पुरस्कार ममता बॅनर्जी स्वीकारणार नसल्याचे अकादमीने जाहीर केले.
Web Title: Objection On Literary Service Mamata Banerjee Kolkata
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..