ओडिशात आमदाराची कार घुसली गर्दीत; २२ जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओडिशात आमदाराची कार घुसली गर्दीत; २२ जण जखमी

ओडिसात आमदाराने गर्दीत कार घुसवल्यानं २२ जण जखमी झाले आहेत.

ओडिशात आमदाराची कार घुसली गर्दीत; २२ जण जखमी

भुवनेश्वर - ओडिसात आमदाराने गर्दीत कार घुसवल्यानं २२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये सात पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बीजेडीचे चिलिका मतदारसंघातील आमदार प्रशांत जगदेव यांच्या गाडीने लोकांना चिरडल्याची घटना घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजप समर्थकांसह मोठ्या प्रमाणावर नागरिक बनापूर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसच्या समोर जमा झाले होते. विभागीय अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ते एकत्र आले असताना ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनेनंतर जगदेव यांच्यावर काही लोकांनी हल्ला केल्यानंतर तेसुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसंच या घटनेत कोणीही मृत्यूमुखी पडले नसून घटनेची चौकशी केली जात असल्याचं खुर्दा पोलिस अधीक्षक एसपी अलेख चंद्र पाधी यांनी सांगितलं आहे.

Web Title: Odisha 22 Injured Bjd Mla Rams Car Crowd Leader Assaulted Later

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpOdisha