Odisha Assembly Election : भाजपचा २५ वर्षांपासून एकतर्फी सत्ता गाजवणाऱ्या BJDला धोबीपछाड! ८० जागा जिंकत मिळवलं स्पष्ट बहुमत

Odisha Assembly Election Result 2024: राज्यात बहुमतासाठी ७४ जागांवर विजय आवश्‍यक असताना भाजपला ८० जागा मिळाल्या आहेत.
odisha assembly election 2024  BJP wins  80  seats and gets majority in Odisha Assembly marathi news
odisha assembly election 2024 BJP wins 80 seats and gets majority in Odisha Assembly marathi news


भुवनेश्‍वर : ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने इतिहास घडविला. मागील २५ वर्षांपासून एकतर्फी सत्ता गाजविलेल्या बिजू जनता दलाला धोबीपछाड देत भाजपने राज्यातील १४७ जागांपैकी ८० जागांवर विजय मिळवत बहुमताला गवसणी घातली. त्यामुळे ओडिशामध्ये प्रथमच भाजपचे सरकार सत्तेत येणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील ‘बीजेडी’ला ५९ जागांवर विजय मिळाला.

लोकसभेबरोबरच ओडिशामध्ये विधानसभेसाठीही मतदान झाले होते. लोकसभेसाठी आघाडी होऊ न शकलेल्या ‘बीजेडी’ला सत्तेतून बाहेर फेकण्याच्या उद्देशानेच भाजपने राज्यात जोरदार प्रचार केला होता. पटनाईक यांनीही राज्यभर दौरे काढले होते. मात्र, ‘सरकारी बाबूंकडून सरकार चालविले जात असल्याचा’ भाजपने केलेला प्रचार प्रभावी ठरला आणि मतदारांनी प्रथमच भाजपच्या उमेदवारांना मतांचे दान दिले.

राज्यात बहुमतासाठी ७४ जागांवर विजय आवश्‍यक असताना भाजपला ८० जागा मिळाल्या आहेत. जागांचे अर्धशतक कसेबसे पूर्ण केलेल्या ‘बीजेडी’ला आता प्रथमच विरोधी पक्षाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपने आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली. विजय स्पष्ट होताच भाजपच्या कार्यालयांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत आनंद व्यक्त केला.

odisha assembly election 2024  BJP wins  80  seats and gets majority in Odisha Assembly marathi news
Baramati Lok Sabha : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे मोठ्या आघाडीवर, २६ हजार मतांचा फरक

भाजपची वाढती ताकद


बिजू जनता दलाची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांतच नवीन पटनाईक हे सर्वप्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सातत्याने त्यांचाच पक्ष सत्तेत विजयी होत असून नवीन पटनाईक हेच सलग पाच वेळा मुख्यमंत्रिपदावर आहेत. ‘बीजेडी’च्या आधी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. नंतर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेला. मात्र, २०१४ पासून राज्यातील भाजपची ताकद वाढून मागील निवडणुकीत हा पक्ष प्रमुख विरोधक बनला होता. भाजपची ताकद वाढली, तशी ‘बीजेडी’चीही वाढली होती. २००९ पासून या पक्षाच्या ताब्यात शंभराहून अधिक जागा होत्या. अशी परिस्थिती असताना भाजपने या गडाला खिंडार पाडून बहुमत मिळविले, हे लक्षणीय यश असल्याचे मानले जात आहे.

odisha assembly election 2024  BJP wins  80  seats and gets majority in Odisha Assembly marathi news
Nashik Constituency Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे किंग! ठाकरे गटाने गोडसेंना दाखवलं अस्मान

एक गड पडला


भाजपच्या विरोधात अपवाद वगळता देशभरातील सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले आहेत. ओडिशा, पश्‍चिम बंगाल, आंध्र, तमिळनाडू, केरळ अशी काही निवडक मोठी राज्ये वगळली तर भाजपला कोठेही प्रादेशिक पक्षांचे आव्हान उरले नव्हते. या राज्यांतील ओडिशा हे एक राज्य आता भाजपने ‘राष्ट्रीय’ केले आहे. येथील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘१० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल,’ असे विधान केले होते. हे विधान सत्यात उतरत आहे. भाजपने अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

पक्षीय बलाबल
एकूण जागा : १४७
भाजप : ८०
बीजेडी : ५०
काँग्रेस : १५
इतर : २

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com