
female student allegedly set herself on fire after repeated harassment : ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. येथील फकीर मोहन कॉलेजच्या एका विद्यार्थीनीने चक्क कॉलेज परिसरातच स्वत:ला पेटवून घेतलं. यानंतर कॉलेजमध्ये एकच गोंधळ उडाला होता.स्वत:ला पेटवून घेतल्यानंतर ती पीडित विद्यार्थीनी कॉलेज कॅम्पसमध्ये ओरडत पळत होती, त्यामुळे कॉलेजमधील अन्य विद्यार्थी देखील प्रचंड घाबरले आणि पळत सुटले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.
विद्यार्थीनीने हे टोकाचं पाऊल का उचललं याचे कारणही समोर आले आहे. त्या कॉलेजमधीलच एका प्रचार्याकडून पीडित विद्यार्थीनीचा अनेक दिवसांपासून लैंगिक छळ सुरू होती, यामुळे ती विद्यार्थीनी प्रचंड वैतागलेली होती आणि मानसिक तणावतही होती. या घटनेमुळे आता कॉलेजबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिवाय, कॉलेजमधील अन्य विद्यार्थीही चिडलेले आहेत. तर याप्रकरणी कॉलेज प्रशसानाने प्रिन्सिपल दिलीप कुमार घोष यांना तत्काळ निलंबित केले आहे.
प्राप्त माहितीनुसार ही घटना आज(शनिवार) दुपारी एफएम कॉलेज कॅम्पस परिसरात घडली. पीडित विद्यार्थीनी इंटिग्रेटेड बी.एड. प्रोग्रामच्या दुसऱ्या वर्षात शिकते. या विभागाचे एचओडी समीर कुमार साहू यांच्यावर विद्यार्थीनीने शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे या छळाबद्दल विद्यार्थीनीने अनेकदा तक्रारही केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले होते. अखेर हा त्रास सहन होत नसल्याने विद्यार्थीनीने आज हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
एवढंच नाहीतर या प्रकारामुळे वैतागलेली ही विद्यार्थीनी काही दिवसांपासून कॉलेजच्या गेटवर धरणे आंदोलनही करत होती. तर प्रत्यक्षर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही विद्यार्थीनी कॉलेजच्या आएवारात एकटीच आली होती, त्यावेळी तिच्या हातात रॉकेलची कॅन होती आणि काही क्षणातच तिने ती अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले.
यानंतर ती वेदनेने जोरजोरात ओरड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पळत सुटली, तिला वाचवण्याचा काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला मात्र ती गंभीररित्या भाजलेली आहे. शिवाय तिला वाचवणारेही भाजले गेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांवर एम्स भुवनेश्वर येथे उपचार सुरू आहेत.