
ओडिशा दक्षता विभागाने रस्ते आणि नियोजन विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्याविरुद्ध उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता केल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. विभागाने अंगुल, भुवनेश्वर आणि पुरीमधील पिपिली येथे सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि सुमारे २.१ कोटी रुपये रोख जप्त केले. या कारवाईदरम्यान एक धक्कादायक घटनाही उघडकीस आली. सारंगीने दक्षता अधिकाऱ्यांना पाहून त्यांच्या भुवनेश्वर फ्लॅटच्या खिडकीतून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडले खाली फेकली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.