सर्वात मोठा दरोडा : फक्त दहा मिनिटांत लुटले, 11 कोटी रुपये

gold
gold

भूवनेश्वर (Odisha)- ओडिशातील कटकमध्ये दरोडेखोरांनी जवळजवळ 11 कोटींचे सोने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कटकच्या पुरी भागात आयआयएफएल (इंडिया इंपोलाईन फाइनान्स लिमिटेड) गोल्ड लोनच्या एका शाखेमध्ये गुन्हेगारांनी शस्त्रास्त्रांच्या जोरावर 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोने आणि साडे चार लाख रुपये रोख लुटले आहेत. गुरुवारी घडलेल्या या केवळ 10 मिनिटाच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. 

माहिती मिळताच पोलिस, कटकचे डीसीपी आणि पोलिस कमीशनर घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणात अद्याप कोणलाही अटक करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी कार्यालय सुरु करण्यात आले होते. यावेळी सकाळी 9.45 बाईकवर आलेले चार दरोडेखोर कार्यालयात घुसले. आतमध्ये येताच त्यांच्यातील एकाने कार्यालयाचे शटर लावून घेतले. तेथे असणाऱ्या तीन सुरक्षारक्षकांना जबर मारहाण करण्यात आली. 

भारतीय-अमेरिकी डॉक्टरला सापडला कोरोनावरील उपचार! उंदरांवर केला होता प्रयोग

बंदुकीचा धाक दाखवत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्यात आले. जबरदस्तीने लॉकर उघडण्यात आले. लॉकरमध्ये असलेले 10 कोटींपेक्षा अधिक किंमतीचे सोने आणि साडेचार लाखांची रोख रक्कम लुटण्यात आली. त्यानंतर दरोडेखोर तेथूळ फरार झाले. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असली तरी सर्व गुन्हेगारांनी तोंड झाकले असल्याने त्यांची ओळख करण्यात अडचणी येत आहेत. 

कार्यालय मुख्य रस्त्यावर आहे. शिवाय याठिकाणी वर्दळही असते. असे असताना दरोडेखोरांनी लूट केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कटकचे डीसीपी प्रतिक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.15 वाजता लुटीची सूचना मिळाली. त्यानंतर त्वरीत पोलिस आणि विविध झोनचे एसीपी घटनास्थळी पोहोचले. दरोडेखोर ओडिया आणि हिंदी भाषा बोलत होते. त्यांना पडकण्यासाठी कटर, जाजपूर, जगतसिंहपूर आणि केंद्रपाडा जिल्ह्यांत रस्त्यांना सील करण्यात आले आहे. 

लूट करण्यासाठी कार्यालयातील कोणत्या कर्मचाऱ्याने किंवा सुरक्षारक्षकाने मदत केलीये का, याचा तपास केला जात आहे. घटनेनंतर सोने ठेवणाऱ्या लोकांनी कार्यालयात येऊन चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, दरोडेखोरांना पकडण्यासाठी एका विषेश टीमची मदत घेतली जात आहे. दरोडेखोरांनी मास्क घातला होता, शिवाय ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घातले होते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com