भारतीय-अमेरिकी डॉक्टरला सापडला कोरोनावरील उपचार! उंदरांवर केला होता प्रयोग

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 21 November 2020

विषाणूवर प्रभावी ठरणारी लस किंवा उपचार शोधण्यासाठी वैज्ञानिकांकडून दिवसरात्र प्रयत्न केले जात आहेत

वॉशिंग्टन- भारतीय-अमेरिकी डॉक्टरांनी कोविड-19 (Covid-19) रुग्णांच्या फुफ्फुसांचे जीवघेणे होणारे नुकसान आणि इतर भागांची निष्क्रियता रोखण्यासाठी उपचार पद्धतीचा शोध लावल्याचा दावा केला आहे. भारतात जन्मलेल्या आणि टेनेसी सेंट ज्यूड चिल्ड्रन रिसर्च हॉस्पिटलमध्ये संशोधक म्हणून काम करणाऱ्या डॉ. तिरुमला देवी कन्नेगांती यांनी यासंबंधीचा शोधनिबंध 'सेल'च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केला आहे. 

तिरुमला देवी यांनी उंदरांवर प्रयोग करुन पाहिला आहे. यात त्यांना आढळून आले की, कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर कोशिकांच्या सूजण्यामुळे शरिरातील अंग निकामी होण्याचा संबंध 'हाइपरइनफ्लेमेटरी'शी असून याचा शेवट मृत्यू होण्यात होतो. अशा परिस्थिती वाचवण्यासाठी संभावित औषधाचा शोध त्यांनी लावला आहे. विषाणूची कोशिकांवर कार्य करण्याची पद्धती आणि सूज निर्माण करण्याच्या कारणांची माहिती मिळाल्याने चांगला उपचार करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल पडले आहे. 

तिरुमला देवी यांचा जन्म तेलंगणात झाला आहे. इथेच त्यांचे बालपण गेले आहे. त्यांनी वारंगलच्या काकतिय विश्वविद्यालयातून रसायन शास्त्र, जंतू विज्ञान आणि वनस्पती विज्ञानात पदवी घेतली आहे. त्यांनी पीएचडी भारताच्या उस्मानिया विश्वविद्यालयातून घेतली आहे. 2007 मध्ये डॉ. कन्नेगाती टेनेसी राज्याच्या मेमफिस येथिल सेंट ज्यूड हॉस्पिटलशी जोडल्या गेल्या. 

Corona Update : देशात दुसऱ्या लाटेचा धोका; 47 दिवसानंतर आलेख पुन्हा वरच्या...

तिरुमला देवी म्हणाल्या की, ''या शोधामुळे आपल्या ज्ञानात अधिक भर पडेल. आम्ही 'साईटोकींस' ( कोशिकामध्ये असलेला एक छोटा प्रोटिन ज्यामुळे संप्रेषण होते) ची ओळख केली आहे, जो कोशिकामध्ये सूज निर्माण करुन त्यांना मृत करण्याच्या दिशेने घेऊन जातो. या शोधामुळे कोविड-19 आणि उच्च मृत्यूदराच्या आजारांचा संभावित इलाज शोधला जाऊ शकतो.'' या संशोधनामध्ये श्रद्धा तुलाधर, पिरामल समीर, मिन झेंगे, बालामुरुगन सुंदरम, आलाजी भनोठ, आरके सुब्बाराव, मलिरेड्डी इत्यादींचा समावेश होता.  

दरम्यान, कोरोनाचा प्रकोप अजून थांबलेला नाही, अशा स्थितीत विषाणूवर प्रभावी ठरणारी लस किंवा उपचार शोधण्यासाठी वैज्ञानिकांकडून दिवसरात्र प्रयत्न केले जात आहेत. कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली असून डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा 2021 च्या सुरुवातीला लस मिळण्याची आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian american doctor found treatment on corona