Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचे विधान निराशाजनक; ओडिशा उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Women Safety: महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर ओडिशा उपमुख्यमंत्री पार्वती परिदा यांनी ममता बॅनर्जींच्या विधानावर तीव्र टीका करत महिलांचा आत्मविश्वास कमी करणारे वक्तव्य असल्याचे सांगितले.
भुवनेश्वर : महिलांनी रात्री उशीरा घराबाहेर न पडण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेला सल्ला निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया ओडिशा सरकारने सोमवारी दिली.