esakal | देशासोबत गद्दारी, पाकला सिक्रेट माहिती देणाऱ्या DRDO च्या चौघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Agni 5 missile likely to be inducted soon

देशासोबत गद्दारी, पाकला सिक्रेट माहिती देणाऱ्या DRDO च्या चौघांना अटक

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: संरक्षणासंबंधीची गोपनीय माहिती (classified defence secrets) परदेशी एजन्टसना लीक केल्याच्या आरोपाखाली स्पेशल युनिटने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) चार कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. ओदिशामधील बालासोर (odisha Balasore) पोलिसांच्या स्पेशल युनिटने ही कारवाई केली आहे. शेजारी देश म्हणजेच पाकिस्तानसाठी (pakistan) हे चारही कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे. चांदीपूरमध्ये डीआरडीओचा परीक्षण तळ आहे. या तळासंबंधीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

DRDO मध्ये नोकरी करत असल्याने, या चारही कर्मचाऱ्यांची परीक्षण तळावर सतत ये-जा सुरु असायची. चारही आरोपी बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवाशी आहेत. चांदीपूर येथील डीआरडीओच्या युनिटमध्ये काम करणारे काही जण संरक्षणासंबंधीची गोपनीय माहिती परदेशी एजन्टसना देत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती, त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असे बालासोरचे पोलीस अधीक्षक सुधांशू मिश्रा यांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: iPhone 13 सीरीज लॉंच, काय आहेत फीचर्स-किमती? वाचा डिटेल्स

"वेगवेगळ्या आयएसडी फोन नंबरवरुन त्यांच्याशी संपर्क साधला जायचा. त्या बदल्यात त्यांना आर्थिक लाभ मिळत होता. मिळालेल्या इनपुटच्या आधारावर त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम्स बनवण्यात आल्या होत्या" अशी माहिती सुधांशू मिश्रा यांनी सांगितले.

हेही वाचा: तुमच्या 'या' चार सवयी गर्लफ्रेंडला ठरु शकतात त्रासदायक

एक आरोपी पृथ्वी क्षेपणास्त्र केंद्राच्या पॅड तीन येथे काम करत होता. तो नियमित पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता. तो स्वत: ISD कॉल करायचा आणि त्याला ISD कॉल सुद्धा यायचे असे सूत्रांनी सांगितले. डीआरडीओमधल्या मिसाइल निर्मिती संबंधीची गोपनीय माहिती त्याने पाकिस्तानी हँडलर्सना दिल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ISD कॉलवरुन पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सहा टीम्स बनवल्या होत्या.

loading image
go to top