iPhone 13 सीरीज लॉंच, काय आहेत फीचर्स-किमती? वाचा डिटेल्स

iPhone 13
iPhone 13Google

Apple कंपनीने आपली iPhone 13 Series लाँच केली आहे. कंपनीने एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये iPhone 13, iPhone 13 Pro, iPad mini आणि iPhone 13 Pro Max हे चार स्मार्टफोन लाँच केले. हे नवीन आयफोन चार कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. तसेच या स्मर्टफोनमध्ये कंपनीचा लेटेस्ट A15 बायोनिक चिपसेट देण्यात आली आहे. कंपनीने या लेटेस्ट iPhones मध्ये 5G कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे,चला तर मग या नवीन स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

iPhone 13 आणि iPhone 13 mini

कंपनीने iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. त्याचबरोबर iPhone 13 mini मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या दोन्ही स्मार्टफोनचा डिस्प्ले OLED पॅनलचा आहे. फोनचा मुख्य भाग हा अॅल्युमिनियमचा बनलेला आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनला वेगळा लुक मिळतो. कंपनीने 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी व्हेरियंटमध्ये हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

प्रोसेसरबद्दल सांगयचे झाल्यास तर यामध्ये अॅपलचा लेटेस्ट ए 15 बायोनिक चिपसेट देण्यात येत आहे. कंपनीचा दावा आहे की iPhone 13 मध्ये कोणत्याही स्मार्टफोनपेक्षा सर्वात वेगवान सीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी iPhone 13 आणि 13 mini स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सेल वाइड कॅमेरासह 12-मेगापिक्सेल ट्रूडेप्थ कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने iPhone 12 मिनीपेक्षा आयफोन मिनी 1.5 तास अधिक बॅटरी लाईफ देईल. तसेच iPhone 13 मध्ये, कंपनी आयफोन 12 पेक्षा 2.5 तास अधिक बॅटरी बॅकअप देते.

Apple ने आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीच्या किंमती या अनुक्रमे 79,900 आणि 69,900 रुपये ठेवल्या आहेत.

iPhone 13
Apple चे नवीन iPad आणि iPad mini लॉन्च; पाहा किंमत आणि फीचर्स

iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max

iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max हे दोन्ही स्मार्टफोन्स iOS 15 आऊट ऑफ द बॉक्सवर सिस्टीमवर काम करतात. आयफोन 13 च्या प्रो व्हेरियंटमध्ये कंपनीनेने 128 जीबी आणि 512 जीबी सोबतच 1TB इंटरनल स्टोरेज व्हेरियंट देखील देले आहे.

A15 बायोनिक चिपसेट प्रो आणि प्रो मॅक्स व्हेरियंट मध्ये सुद्धा दिले जात आहे. कंपनीचा दावा आहे की हा चिपसेट मागील आयफोनच्या तुलनेत 50 टक्के चांगला ग्राफिक्स परफॉर्मन्स देतो. तसेच स्मार्टफोनमध्ये दिसणारा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

कॅमेरा, Apple iPhone 13 Pro आणि Pro Max मध्ये अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 12-मेगापिक्सल 3x ऑप्टिकल झूम टेलीफोटो लेन्ससह वाइड-एंगल कॅमेरा देण्यात येत आहे. स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी सिनेमॅटिक मोड देखील देण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे फोनचा फ्रंट कॅमेरा देखील सिनेमॅटिक मोडसह येतो.

कंपनी सांगीतल्यानुसार Phone 13 Pro ची किंमत ही 1,19,900 रुपयांपासून आणि iPhone 13 Pro Maxची किंमत 1,29,900 रुपयांपासून सुरू होईल जी मागच्या वर्षाच्या 12 प्रो आणि 12 प्रो मॅक्सच्या किंमतीएवढीच आहे. दरम्यान हे फोन 17 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी, तर 24 सप्टेंबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध असतील.

iPhone 13
MG Astor SUV भारतात लाँचिंगसाठी सज्ज; काय आहेत फीचर्स? वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com