
ओडिशा सरकारने आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ५,३१८ भिकारी ओळखले आहेत आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'सहाय योजना' राबवत आहे. राज्याचे सामाजिक सुरक्षा आणि अपंग सक्षमीकरण मंत्री नित्यानंद गोंड यांनी शुक्रवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही माहिती दिली आहे.