
ओडिशात भ्रष्टाचारविरोधात आक्रमक मोहिम सुरू असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. विजिलन्स विभागाकडून ग्रामीण विकास भागातील मुख्य अभियंता वैकुंठनाथ सारंगी याच्यावर कारवाई करण्यात आली. विजिलन्स विभागाचे कर्मचारी धाड टाकण्यासाठी पोहोचले असताना सांरगी याने ५०० रुपयांचे नोटांचे बंडल खिडकीतून बाहेर टाकले होते. जवळपास ५० लाखांची रोकड खिडकीतून बाहेर टाकली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.