Odisha HC : 'लग्नाचं वचन मोडलं, तरी सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाही'; हायकोर्टाचा मोठा निर्णय

यावेळी ओडिशा हायकोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला.
Odisha HC
Odisha HCeSakal
Updated on

ओडिशा उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. लग्नाचं वचन देऊन सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हे वचन पूर्ण न केल्यास बलात्कार ठरत नाहीत; असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. यामुळे भुवनेश्वरमधील एका तरुणावर असलेले बलात्काराचे आरोप रद्द करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

न्यायमूर्ती आर. के. पटनायक यांनी याबाबत निर्णय दिला. दरम्यान, बलात्काराचा आरोप रद्द केला असला; तरी तरुणावरील फसवणूकीच्या आरोपाबाबत चौकशी सुरू राहणार आहे. (Odisha High Court decision)

Odisha HC
मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त करणे म्हणजे...; मुंबई HC चा रिक्षाचालकाला दिलासा

"लग्नाचं वचन हे एका विश्वासाने दिलं जातं. वचन देऊन काही कारणास्तव ते पूर्ण करू न शकणं; आणि सुरुवातीपासूनच लग्नाचं खोटं वचन देणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर सुरुवातीपासूनच लग्नाचं खोटं वचन दिलं असेल, तर त्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मात्र, या प्रकरणात असं झालेलं नाही"; असं न्यायमूर्तींनी म्हटलं.

Odisha HC
Meghalaya HC : '१६ वर्षांची मुलगी सेक्सचा निर्णय घेण्यासाठी सक्षम'; हायकोर्टाने बॉयफ्रेंडवरील पॉक्सोचा गुन्हा केला रद्द!

सर्वोच्च न्यायालयाचा दाखला

यावेळी ओडिशा हायकोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात असं म्हटलं होतं, की जर एखाद्या व्यक्तीने लग्नाचं वचन देऊन महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले; आणि पुढे जाऊन हे लग्न होऊ शकलं नाही तर त्याला बलात्कार म्हणता येत नाही.

बिघडलेलं नातं फसवणूक नाही

"एखादं नातं, जे चांगल्या आणि प्रामाणिक मैत्रीतून सुरू झालं होतं; ते पुढे जाऊन बिघडलं तर त्याला नेहमीच फसवणूक म्हणता येत नाही. अशा प्रकरणात कधीही पुरुषावर बलात्काराचा आरोप करू नये", असंही हायकोर्टाने या प्रकरणाबाबत म्हटलं.

Odisha HC
Madras HC : गृहिणी घरात २४ तास करतात काम; पतीच्या अर्ध्या संपत्तीवर पत्नीचाही हक्क! हायकोर्टाचा निर्वाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.