रायगड (ओडिशा) : ओडिशाच्या रायगड जिल्ह्यातील बगनागुडा गावात एका आंतरजातीय विवाहानंतर (Odisha Intercaste Marriage) धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आदिवासी (एसटी) मुलीने अनुसूचित जातीच्या (एससी) तरुणाशी प्रेमविवाह (Love Marriage) केल्याने तिच्या संपूर्ण कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. ग्रामस्थांच्या दबावाखाली कुटुंबातील ४० सदस्यांनी जबरदस्तीने मुंडण करून घेतले व एका प्राण्याचा बळी देत तथाकथित शुद्धीकरण विधी पार पाडला.