Odisha Plane Crash : ओडीशामध्ये भीषण दुर्घटना! भुवनेश्वरहून राउरकेला जाणारे विमान कोसळले

Bhubaneswar to Rourkela flight crashed : राउरकेलापासून सुमारे १० ते १५ किलोमीटर अंतरावर विमान कोसळल्याची माहिती आहे.
Wreckage of the aircraft after a tragic Odisha plane crash involving a Bhubaneswar to Rourkela flight, as rescue teams conduct emergency operations at the crash site.

Wreckage of the aircraft after a tragic Odisha plane crash involving a Bhubaneswar to Rourkela flight, as rescue teams conduct emergency operations at the crash site.

esakal

Updated on

Odisha flight crash news :ओडिशातील राउरकेला येथून एका भीषण अपघाताची समोर येत आहे. भुवनेश्वरहून राउरकेलाला जाणारे विमान कोसळले आहे. प्राप्त माहितीनुसार, हे विमान ९ आसनी होते आणि ज्यामध्ये एकूण ७ जण होते. अपघात झाला तेव्हा ६ प्रवासी आणि एक पायलट होता. 

सध्या या अपघातात सर्वजण जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राउरकेलापासून सुमारे १० ते १५ किलोमीटर अंतरावर विमान कोसळल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. शिवाय, त्तातडीने बचावकार्य सुरू झाले. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे. जखमी प्रवाशांना आणि वैमानिकाला रुग्णालयात पाठवण्यात आले.

Wreckage of the aircraft after a tragic Odisha plane crash involving a Bhubaneswar to Rourkela flight, as rescue teams conduct emergency operations at the crash site.
Amazon Great Republic Day Sale 2026 : ‘ॲमेझॉन’चा ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ होणार सुरू ; तारीख जाहीर

एवढंच नाहीतर भुवनेश्वरहून पर्यटन विभागाचे एक पथकही परिस्थितीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले असून, चौकशी सुरू आहे. नेमकी परिस्थिती आणि विमान कशामुळे कोसळले हे तपासानंतरच अधिकृतपणे निश्चित होणार आहे. एवढ्या भीषण अपघातानंतरही विमानामधील सर्वजण सुरक्षित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com