Amazon Great Republic Day Sale 2026 : ‘ॲमेझॉन’चा ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ होणार सुरू ; तारीख जाहीर

Amazon Great Republic Day Sale 2026 Start Date : यंदा ॲमेझॉनने या सेलसाठी ‘SBI’शी केली आहे भागीदारी; जाणून घ्या, कार्ड वापरकर्त्यांना किती इस्टंट डिस्काउंट मिळणार?
Amazon Great Republic Day Sale 2026

Amazon Great Republic Day Sale 2026

esakal

Updated on

Best Deals in Amazon Republic Day Sale : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या ‘अमेझॉन’चा ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२६’ लवकरच सुरू होत आहे. अमेझॉनने या सेलची तारीख जाहीर केली आहे. यावेळी, त्यांनी सेलसाठी एसबीआयशी भागीदारी केली आहे. 

याचा अर्थ असा की जर तुम्ही एसबीआय कार्ड वापरून खरेदी केली तर तुम्हाला १० टक्के त्वरित सवलत मिळेल. या सेलसाठी स्वतंत्र मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या काही खास ऑफर्सची माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे.

तर हा अमेझॉन सेल १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या सेल दरम्यान दररोज प्राइम-एक्सक्लुझिव्ह ऑफर्स दिल्या जाणार आहेत. विविध प्रॉडक्ट्सवर सवलती तर मिळतीलच, शिवाय तुम्ही एक्सचेंज डिस्काउंटचाही लाभ घेऊ शकता. एवढच नाहीतर ग्राहकांच्या सोयीसाठी, नो-कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.

Amazon Great Republic Day Sale 2026
India Hydrogen Train : मोठी बातमी! देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनच्या लाँचिंगचा मुहूर्त आला समोर

ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स -

या विशेष सेलसाठी तयार करण्यात आलेली मायक्रोसाइट बघितल्यानंतर असे दिसून येते की ग्राहकांना ब्लॉकबस्टर डील्स, एक्सचेंजसह ब्लॉकबस्टर डील्स, टॉप १०० डील्स, प्राइस क्रॅश स्टोअर, 8pm डील्स आणि ट्रेडिंग डील्सचा लाभ घेता येईल. सेलमध्ये अमेझॉन कॉम्बो, बाय मोर सेव्ह मोर, अमेझॉन कूपन डिस्काउंट आणि एक्सचेंज फेअर यासारख्या आकर्षक ऑफर्स देखील आहेत.

Amazon Great Republic Day Sale 2026
8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! DA अन् DR मध्ये लवकरच वाढीचे संकेत

या व्यतिरिक्त सेल दरम्यान, स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, गेमिंग कन्सोल, स्मार्ट ग्लासेस, आणि स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मोठी सूट मिळेल. ग्राहकांनी तत्काळ चेकआउटसाठी त्यांच्या प्रोफाइलमध्ये त्यांची क्रेडिट किंवा डेबिट कार्ड माहिती आधीच टाकलेली असावी, याशिवाय डिलिव्हरी पत्ता देखील आधीपासूनच सेव करण्याची सूचना Amazon ने केली आहे. सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या आकर्षक डीलची अचूक माहिती लवकरच उघड होण्याची अपेक्षा आहे आणि सेलची तारीख जवळ येताच अधिक तपशील समोर येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com